अकोल्याच्या दोन तरुणांनी बनवली शेतीची अनोखी अवजारं
मजूर टंचाईवर उपाय म्हणून 35 प्रकारची शेतीची अवजारं दोन इंजिनिअर्स तरुणांनी बनवली आहेत.
अक्षय वैराळे आणि अक्षय कवळे या दोन इंजिनियर मित्रांनी पुण्यात काही वर्षं नोकरी केल्यानंतर अकोल्यात गावाकडे परतले. आणि त्यांनी स्वत:चं स्टार्टअप सुरू केलं.
आता या कंपनीची सध्याची वार्षिक उलाढाल 80 लाखांपर्यंत आहे. या स्टार्टअपची सरकारच्या ‘अटल इनोव्हेटिव मिशन’ या उपक्रमासाठी नुकतीच निवड झाली आहे. आता या माध्यमातून देशभरातील जास्तीस्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचं या तरुण उद्योजकांचं उद्दिष्ट आहे.

