अकोल्यातील दोन तरुणांनी शेती करण्याची पद्धत बदलली, स्टार्टअप सुरू केलं अन् केवळ दोन वर्षात केली कोटींची उलाढाल
Success Story of Akshay Wairale And Akshay Kawale: महाराष्ट्रातील दोन तरुणांनी आपल्या शिक्षणाचा फायदा शेतकऱ्यांसाठी केला. फक्त दोन हजार रुपयांचे मशीन बनवत शेतीची पद्धतच बदलली कस ते जाणून घ्या…
महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील दोन मित्रांनी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांची नावे अक्षय कावळे आणि अक्षय वैराळे आहेत. दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांमुळे त्रस्त असलेल्या त्यांच्या भागातील शेतकऱ्यांचे दुःख त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. अभियांत्रिकी आणि कृषी व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ते घरी परतले आणि अॅग्रोश्योर प्रॉडक्ट्स अँड इनोव्हेशन नावाचा एक स्टार्टअप सुरू केला.
शेतकऱ्यांसाठी परवडणारी, शाश्वत आणि जेंडर फ्रेंडली मशीन विकसित करणे. ध्येय होते त्यांची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवणे. आज, 30 हून अधिक मशीन्सच्या पोर्टफोलिओसह, हे स्टार्टअप सहा राज्यांमधील 20,000 हून अधिक शेतकऱ्यांचे नशीब बदलत आहे. त्यांचा व्यवसायही वेगाने वाढला आहे. अक्षय कावळे आणि अक्षय वैराळे यांच्या यशाच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.

